Mumbai News : मुंबई शहरात हक्काच्या घराचा शोध घेणारे अनेकजण दर दिवशी पाहायला मिळतात. घरासाठी शोध घेणाऱ्यांपासून घरासाठीच्या कर्जाचा हफ्ता फेडणाऱ्यांपर्यंत प्रत्येकालाच हे शहर आपलंसं करून घेतं. अशा या शहराचा चेहरामोहरा मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बदललला आहे. लहान वस्त्यांची जागा मोठाच्या आणि गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे. सामान्य मुंबईकरानं उपनगरांच्या दिशेनं कूच केली असून, शहरात सध्या धनाढ्यांचीच गर्दी होताना दिसत आहे.
मुंबईला जगाच्या नकाशावर मिळणारं स्थान आणि आता खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या नवनवीन उंची गाठणारी हीच मुंबई सामान्यांच्या खिशाला परवडणार नाही, इतकी महाग झाली आहे. शहरात नुकत्याच झालेल्या एका व्यवहारामुळं तर हेच सिद्ध होत आहे.
Zapkey नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शहरात नुकताच एका सीव्ह्यू अपार्टमेंट/ पेंटहाऊसची विक्री झाली असून, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा व्यवहार ठरला आहे. 360 One च्या ससंस्थापक आणि जॉईंट सीईओ असणाऱ्या यतिन शाह यानं मुंबईतील वरळी इथं तब्बल 158.51 कोटी रुपयांना एक पेंटहाऊस खरेदी केलं आहे.
प्राईम सीजे रेसिडेन्सी प्रकल्पाचा भाग असणारं हे पेंटहाऊस 10312 चौरस फूट इतक्या क्षेत्रफळाचं असल्याचं सांगितलं जात असून, हे एक ड्यूप्लेक्स अपार्टमेंट आहे. प्राईम सीजे रेसिडेन्सिचा हा प्रकल्प सध्या निर्माणाधीन असून, 33 मजल्यांच्या या टॉवरमध्ये 19 घरं उपलब्ध असणार आहेत. जून 2025 मध्ये या इमारतीचं बांधकाम पूर्ण होणार आहे. 4 आणि 5 बीएचके घरांची उपलब्धता या इमारतीमध्ये असून, इथं घरांसमवेत आलिशान सुखसोई दिल्या जाणार आहेत, ज्यासाठी कोट्यवधींची रक्कम मोजावी लागणार आहे.
दरम्यान यतिननं खरेदी केलेलं हे पेंटहाऊस 10,312 sft चं असून, इथं एका चौरस फुटासाठी त्यानं साधारण ₹1,53,700/sft रुपये इतकी रक्कम मोजल्यातं म्हटलं जात आहे. याच कारणास्तव हा शहरातील आतापर्यंतचा सर्वात महागडा, घराचा सौदा ठरला आहे. यापूर्वी केकेआर इंडिया या इन्वेस्टमेंट फर्मच्या सीईओपदी असणाऱ्य़ा गौरव तेहराननं दक्षिण मुंबईतील मोरेना हाऊस इथं जेएसडब्ल्यू रिअल्टीमध्ये 88 कोटी रुपयांना आलिशान घर खरेदी करत महागडा व्यवहार आपल्या नावे केला होता.
360 one of the costliest deals at Rs 1.5 lac/sft.
Yatin Shah is the co-founder of asset and wealth management firm 360 One and Joint CEO of 360 One Wealth. He has… pic.twitter.com/mWnKhKDuqa
— Zapkey (@ZapKeyIndia) November 10, 2024
दरम्यान मुंबई शहरामध्ये फक्त आलिशान घरंच नव्हे, तर 1 बीएकचे घरांच्या किमतीसुद्धा उंचावताना दिसत आहेत. मिंटच्या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार शहरात सध्याच्या घडीला 1BHK फ्लॅचसाठी एका वर्षाकाठी 5.18 रुपये इतकं भाडं आकारलं जात आहे. शहरात नोकरीला असणाऱ्या चाकरमान्यांच्या पगारापेक्षा भाड्याच्या घरांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. तर, नव्यानं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांनाही काहीशा अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे ही वस्तूस्थिती.