सोळावं वरीस मोक्याचं…! विस्तारण्यासाठी, वाढण्यासाठी जोडले जा… महाबीजचा सोहळा
Mahabiz Convetion : द गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल (जीएमबीएफ) या व्यावसायिक संघटनेनं महाबीजच्या सातव्या वर्षाचा दोन दिवसीय सोहळा नुकताच दणक्यात साजरा केला. या सोहळ्याची संकल्पना `विस्तारण्यासाठी, वाढण्यासाठी जोडले जा…’ अशी होती
दुबई : '2070 पर्यंत कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करणं हे भारताचं ध्येयआहे…' या विधानानं भारताचे रस्तेआणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शाश्वत विकासाप्रति भारताची भूमिका स्पष्ट केली. 'द गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल' (जीएमबीएफ) या व्यावसायिक संघटनेनं आयोजित केलेल्या महाबीजच्या प्रसंगी गडकरी बोलत होते.
महाबीजच्या दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारीला नितीन गडकरींच्या लाइव्ह भाषणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारताला वरदान ठरलेली अपारंपरिक ऊर्जा आणि शाश्वत प्रगती हे महत्त्वाचे मुद्दे गडकरींनी मांडले. बायोमासपासून स्वयंशाश्वत विमान इंधन, बायो-सीएनजी उत्पादन आणि बांबूवर आधारित बायोइथेनॉल शुद्धीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपायांवर त्यांनी भर दिला. 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटी साध्य करायची तर तंत्रज्ञान, संशोधन यांबरोबरच आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय हे अशक्य आहे अशी भूमिका गडकरींनी मांडली.
द गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल (जीएमबीएफ) या व्यावसायिक संघटनेनं महाबीजच्या सातव्या वर्षाचा दोन दिवसीय सोहळा नुकताच दणक्यात साजरा केला. या सोहळ्याची संकल्पना 'विस्तारण्यासाठी, वाढण्यासाठी जोडले जा…’ अशी होती. ‘महाबीजच्या निमित्तानं व्यावसायिकांना नेटवर्किंगच्या आणि विविध उत्पादनांना वेगवेगळ्या बाजारपेठांची माहिती करून घेण्याच्या संधी जी एमबीएफ उपलब्ध करूनदेत आहे. याचा जीएमबीएफला आणि महाराष्ट्राला असा दुहेरी फायदा नक्कीच होईल' सकाळ माध्यम समूहाचे प्रतापराव पवार यांनी अशा शब्दांत महाबीजचं कौतुक केलं.
दुबईत झालेला हा महाबीज 2024 चा सोहळा ही जीएमबीएफच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अरब अमिरातीतली आणि जगभरातली व्यावसायिक नेतृत्वं, विविध देशांचे राजदूत, मंत्री, राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या काही बड्या व्यक्तिमत्त्वांमुळं हा सोहळा चांगलाच गाजला. या सोहळ्याच्या थीमने मध्य पूर्वेतल्या स्टार्टअप्सच्या शक्यता अधोरेखित केल्या. विविध अफ्रिकन देशांमधून आलेल्या व्यावसायिकांच्या परिसंवादातून अफ्रिकन देशांमधल्या व्यावसायिक संधी उलगडल्या.
यूएईबरोबरच साऊथ अफ्रिका, केनिया, नायजेरिया, जपान, इथिओपिया, रवांडा या देशांमधून आणि भारतातून आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि व्यावसायिकांनी हरितऊर्जा, क्रिप्टो आणि खाणकाम अशा हटके विषयांवरची आपापली मतं व्यक्त केली.
भारतीय संस्कृतीची देण असलेला व सुधैवकुटुंबकम् हा मंत्र जपत जीएमबीएफनं पाचशेपेक्षा जास्त सदस्यांना स्वतःमध्ये सामावून घेतलं आबे, हे सांगून आरकेजी उद्योगसमूहाचे अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी जीएमबीएफच्या कामाची माहिती दिली.समस्येऐवजी सातत्यांनी उपायांवर लक्ष केंद्रित करून काम करणाऱ्या जीएमबीएफसाठी सोळावं वरीस मोक्याचं ठरलंय. या मेळाव्यानं शाश्वत विकास आणि आर्थिक भागीदारी यांविषयीच्या वैचारिक देवाणघेवाणीसाठी व्यावसायिक नेतृत्वांना आणि नव उद्योजकांना जागतिक पातळीवरचं एक व्यासपीठ मिळवूनदिलं. प्रमुख पाहुण्या शेखा जवाहर बिंत खलिफा अल खलिफा यांच्याअस्तित्वानं कार्यक्रमाला राजसी स्पर्श दिला.
भारताचे कॉन्सुल जनरल सतीश कुमार सिवन यांनी गडकरींच्या भावनांचं समर्थन करत भारत आणि अरबअमिराती यांच्यात रुजलेल्या सखोल सांस्कृतिक संबंधांवर जोर दिला.अलीकडच्या काळात झालेल्या द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि भारताच्या मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरवरील आंतर-सरकारी फ्रेमवर्क करारअशा विविध क्षेत्रांमधली आर्थिक एकात्मता आणि सहकार्य वाढवणाऱ्याकरारांवर सिवन यांनी प्रकाश टाकला.
महाबीजच्यानिमित्तानं तयार करण्यात आलेली सर्व प्रतिनिधींची डिरेक्टरी या प्रसंगी प्रकाशित करण्यात आली.
सौदी अरेबिया, जपान, केनिया, रवांडा आणि इथिओपियायांसह बावीस देशांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या उपस्थितीनं महाबीज २०२४ चा जागतिक प्रभाव दिसूनआला असं जीएमबीएफचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांनी म्हटलं. पहिल्या दिवशी चारशेहून अधिक तर दुसऱ्यादिवशी आठशेहून अधिक व्यावसायिकांनी या मेळाव्याला हजेरी लावली. जवळजवळ पंचाऐंशी मिलिअन यूएस डॉलर्सचे विविध व्यावसायिक करारम हाबीजच्या या दोन दिवसांमध्ये झाले.
व्यावसायिक संबंध निर्माण करणे आणि वाढवणे, त्यांतून विकासाला चालना देणे यासाठी महाबीज आणि जीएमबीएफ वचनबद्ध आहे आणि यातच महाबीजचं खरं यश सामावलेलं आहे अशी भावना डॉ. सुनील यांनी व्यक्त केली. त्यांच्या खांद्याला खांदा लावून अथक परिश्रम करणाऱ्या जीएमबीएफटीमच्या सहकाऱ्यांचा या यशातमोठा वाटा आहे अशा कृतज्ञतेच्या शब्दांत त्यांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यातल्या आर्थिक आणि व्यावसायिक शक्यतांची पुनरावृत्ती करत डॉ. सुनील यांनी भावी योजना मांडल्या.
यशस्वी उद्योजकांच्याय शोगाथा, त्रिविक्रम ढोलताशा, रूमादेवींची कहाणी, अनेक व्यावसायिकांचे प्रदर्शनातले स्टॉल्स, बासरीवादन अशा विविध आकर्षणांनी महाबीजचं गंभीर वातावरण हलकंफुलकं करण्यात आयोजकांची कल्पकता झळकली.