ED raids Aamir Khan’s house : कोलकात्यात ईडीने (Enforcement Directorate) मोठी कारवाई केली आहे. कोलकातामधला व्यापारी आमिर खानच्या ( Businessman Aamri Khan) घरात ईडीला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल 17 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. व्यापारी आमिर खान याच्या गार्डन रीच निवासस्थानी ईडीने काल सकाळी छापा टाकला. पाच ट्रंकमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पैशांची मोजणी सुरु केली आणि रात्री उशीरापर्यंत मोजणी सुरुच होती. ईडी अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या रकमेत 500 रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याशिवाय काही 2000 आणि 200 रुपयांच्या नोटा होत्या. प्रिवेंशन ऑफ मनी लॉण्ड्रींग अॅक्ट अंतर्गत (Money Laundering Act) ही कारवाई करण्यात आली. फेडरल बँकेच्या अधिकाऱ्यांनी (Federal Bank officials) मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कोलकाता इथल्या पार्क स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये 15 फेब्रुवारीला FIR च्या आधारे आमिर खान आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.



ईडीने दिलेल्या माहितीनुसार आमिर खान गेमिंग अॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता (gaming app fraud). त्याने ई-नगेट्स (E-Nuggest) नावाचं एक मोबाईल गेमिंग अॅप लॉन्च केलं होतं. सुरुवातील या गेमिंक अॅपच्या (Mobile Gaming App) माध्यमातून युजर्सना चांगली बक्षिसं (Rewards)  देण्यात आली. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवण्यात आल्याने युजर्सचा विश्वास वाढला आणि त्यांनी अॅपमधअये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.


या अॅपची प्रसिद्धी वाढत गेल्याने मोठ्या प्रमाणावर युजर्सने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळए मोठी रक्कम गोळा झाली त्यानंतर अचानक अॅपद्वारे पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर सर्व डेटा अॅप सर्व्हरवरुन हटवण्यात आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं युजर्सच्या लक्षात आलं. युजर्सची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे.