Gautam Adani To Be A Richest Person in the World: प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांची संपत्ती सध्या $131 अब्ज असून जगात ते चौथ्या क्रमांकावर आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होऊ शकतात. सध्या त्यांच्यावर बर्नार्ड अर्नाल्ट यांचा क्रंमाक आहे ज्यांची संपत्ती $149 अब्ज असल्याचे कळते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम अदानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप 10 क्रमांकात आहेत तसेच त्यांच्या संपत्तीतही दिवसागणिक वाढ होते आहे. या यादीत गौतम अदानी पुढे जाऊ शकतात आणि लवकरच ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातील. 


गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत केलेली उत्कृष्ट कामगिरी. 'अदानी ग्रीन', 'अदानी पॉवर', 'अदानी गॅस', 'अदानी विल्मर', 'अदानी पोर्ट', 'अदानी ट्रान्समिशन' आणि 'अदानी अदानी एंटरप्रायझेस' या एकूण 7 अदानी कंपन्या स्टॉक एक्स्चेंजवर वरचढ आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सच्या कामगिरीपासून ते तिमाही निकालापर्यंत सगळेच चित्र हे सकारात्मक आहे.


'रिलायन्स इंडस्ट्रीज'च्या मुकेश अंबानी यांनाही गौतम अदानी यांनी मागे टाकले आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $94.5 अब्ज आहे आणि ते 11व्या क्रमांकावर आहेत ते आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. 


समोर आलेल्या माहितीनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत 54.9 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. इलॉन मस्कची संपत्ती $3.74 अब्ज तर जेफ बेझोस $23.5 अब्ज, बर्नार्ड अर्नॉल्ट $29.1 अब्ज, बिल गेट्स $14.9 अब्ज, लॅरी पेज $18.5 अब्ज, वॉरेन बफे $2.08 अब्ज, सर्गे ब्रिन 18.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे.