बक्कळ परताव्यासाठी या दोन सदाबहार शेअर्समध्ये गुंतवा पैसा; कंपन्यांचे फंडामेंटल्स एकदम मजबूत
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जोखिम देखील असते आणि मालामाल होण्याची संधीही!
मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जोखिम देखील असते आणि मालामाल होण्याची संधीही! येथे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्मसाठीही गुंतवणूक केली जाते. जर तुम्ही दीर्घ काळाच्या गुंतवणूकीसाठी चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर मार्केट एक्सपर्ट सेठी फिनमार्टचे एमडी विकास सेठ यांनी आज दमदार रिटर्न देण्याची क्षमता ठेवणाऱ्या 2 शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
सेठी यांनी कॅश मार्केटमधील 2 दमदार शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे. विकास सेठी यांनी ज्या दोन शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. ते शेअर म्हणजे Stove Kraft आणि Techno Electric होय.
Stove Kraft मध्ये एक्सपर्टची सल्ला
Stove Kraft ही किचन अप्लायन्स बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. जानेवारी 2021 मध्ये कंपनीचा आयपीओ आला होता. दमदार लिस्टिंग झाली होती. एवढेच नाही तर, कंपनीच्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न देखील दिला होता.
Stove Kraft Buy Call
CMP 818
Target 835
SL 785
Techno Electric वर खरेदीचा सल्ला
ही पावर सेक्टरमधील दिग्गज कंपनी आहे. येत्या दिवसांमध्ये या शेअरमध्ये ऍक्शन दिसू शकतो. कारण सरकारने स्मार्ट मीटर एक निश्चित टाइमलाइनमध्ये इंस्टॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी स्मार्ट मीटर बनवण्यात दिग्गज आहे.
Techno Electric - Buy call
CMP - 288.95
Target - 310
Stop Loss - 275