नवी दिल्ली : लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. उत्तर प्रदेशातील कैराना आणि महाराष्ट्रातील पालघर आणि  भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांकडे लक्ष लागले होते. कैरानात आणि भंडाऱ्यात भाजपला जोरदार धक्का बसला. तर पालघरची जागा भाजपने राखली. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा धक्का बसला असून काँग्रेसला अच्छे दिन आल्याचे चित्र दिसून आलेय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीची झलक या पोटनिवडणुकीत दिसून आली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सर्व विरोधक भाजप  विरोधात एकत्र आलेत. आघाडी करत भाजपला रोखण्यात त्यांना यश आले. महाराष्ट्रातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्याविरोधात कुणीच उमेदवार न दिल्यानं या मतदारसंघात मतदान झालं नव्हतं. विश्वजीत कदम बिनविरोध विजयी झालेत.  


लोकसभा पोटनिवडणूक निकाल 


कैराना (उत्तर प्रदेश) - राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम यांनी विजयी. भाजप उमेदवार मृगांका सिंग यांचा तबस्सूम यांनी केला पराभव. काँग्रेस-सपा-बसपा-रालोद एकीने मोदी-शहा-योगी त्रिकुटाला या ठिकाणी मोठा धक्का बसला.


पालघर (महाराष्ट्र) - भाजपचे उमेदवारी राजेंद्र गावित विजयी. शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांना पराभवाचा धक्का बसला. ही जागा भाजपने पुन्हा आपल्याकडे राखली आहे.


भंडारा-गोंदिया - राष्ट्रवादी काँग्रेस मधुकर कुकडे यांनी विजय मिळत भाजपकडची जगा हिसकावून घेतली. येथे भाजपचे हेमंत पटले यांना पराभव पत्कारावा लाग.


विधानसभा पोटनिवडणूक निकाल  


पलूस-कडेगाव (महाराष्ट्र)  विश्वजीत कदम - बिनविरोध
नूरपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पार्टी- विजयी
शाहकोट (पंजाब) - काँग्रेस - विजयी
जोकीहाट (बिहार) - राष्ट्रीय जनता दल- विजयी
गोमिया (झारखंड) -  झारखंड मुक्ती मोर्चा- विजयी
सिल्ली (झारखंड) - झारखंड मुक्ती मोर्चा - विजयी
चेनगन्नूर (केरळ) - माकपा - विजयी
राजराजेश्वरी नगर (कर्नाटक) - काँग्रेस - विजयी
अम्पाती (मेघालय) - काँग्रेस - विजयी
थराली (उत्तराखंड) -  भाजप - विजयी
महेशताला (पश्चिम बंगाल) - तृणमूल काँग्रेस  
नागालँड - नागालँड विधानसभेतील सत्ताधारी नागा पीपल्स फ्रंट