ICAI CA Result Final 2023 : चार्टर्ड अकाउंटंट फायनल आणि फाउंडेशनचा आयसीएआय सीए निकाल 2023 (CA Result 2023) आज जाहीर झाला आहे. इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (ICAI) आज 5 जुलै रोजी निकाल जाहीर झाला. सीए फायनलला बसलेल्या सर्व उमेदवारांची आज प्रतीक्षा संपली आहे. ICAIच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदरावर रिझल्ट बघू शकणार आहेत. (CA Final Result May 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ICAIच्या अधिकृत वेबसाइटवर उमेदवार त्यांच्या रोल नंबर आणि रजिस्टर मोबाइल नंबरची नोंदणी करुन निकाल पाहू शकणार आहेत. सीए इंटर आणि फायनल परीक्षा मे 2023मध्ये आयोजित करण्यात आली होती. 2 मे रोजी परीक्षा सुरू झाली होती आणि 18 मे रोजी परीक्षा संपली होती.  त्यानंतर आज 5 जुलै 2023 रोजी सीएचा निकाल जाहीर झाला आहे. 2-9 मे दरम्यान CA Final (Group 1) ची परीक्षा झाली होती. तर, CA Final (Group 2) ची परीक्षा 11 ते 17 या कालावधीत घेण्यात आली होती. तर, CA Intermediate (Group 1) ची परीक्षा 3 मे चे 10 मे दरम्यान झाली होती. तर, Inter (Group 2) ची परीक्षा मे 12 ते 18 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. 


सीए फायनलमध्ये 8.33 टक्के आणि सीए इंटरमध्ये 10.24 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीए फायनलमध्ये अहमदाबादचा जैन अक्षय रमेशने 800 पैकी 616 (77 टक्के) गुण मिळवून संपूर्ण देशातून टॉप केले आहे. सीए इंटरमध्ये हैदराबादचे गोकुळ साई श्रीकर याने 688 गुण मिळवून ऑल इंडिया रँक १ मिळवला आहे. 


 


कुठे आणि कसा बघाल निकाल


  • निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थी ICAIच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकणार आहात. त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना  icai.nic.in या वेबसाइटवर जा. 

  • वेबसाइटवर CA Inter आणि CA Final Results 2023 हे दोन पर्याय दिसतील

  • त्यातील पर्यायांवर क्लिककरुन एक नवीन वेबपेज सुरु होईल 

  • त्यानंतर तिथे तुमचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका 

  • तुमचा ICAI CA Result 2023 निकाल दिसेल

  • तिथेच असलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करुन तुम्ही निकालाची प्रत डाऊनलोड करु शकता


मागल वर्षी रंजन काब्रा याने CA Intermediate Result 2022मध्ये 666 गुण मिळवून अव्वल ठरला होता. तर मी त अनिल शहा याने CA अंतिम निकालात 2022मध्ये रँक १ मिळवला होता. त्यासा एकूण 642 गूण मिळाले होते.