नवी दिल्ली : कोरोना संकटावर केंद्रीय मंत्र्यांची बैठक झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोरोना रोखण्यासाठी काय योजना आहे याचा आढावा घेण्यात आला. यासह लॉकडाऊननंतर कामगारांच्या स्थलांतराच्या परिस्थितीवरही चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत केंद्रीय मंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, हरदीप पुरी, रामविलास पासवान, सुरेश गंगवार आदींचा समावेश होता. राजनाथ सिंह यांच्या घरी कोरोनासंदर्भात मंत्री मंडळाची ही दुसरी बैठक आहे. यापूर्वीही बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.


केंद्रीय मंत्र्यांच्या या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील जनतेला संबोधित केले. त्यांनी कोरोनाविरूद्ध युद्ध लढणाऱ्या देशवासियांना प्रोत्साहित केले. तसेच कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता संपूर्ण देश प्रकाशित होईल अशी घोषणा केली. प्रत्येकजण आपल्या घरात मेणबत्ती, दिवा किंवा फ्लॅशलाइट लावेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, '5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता घराचे सर्व दिवे बंद करा, घराच्या दाराजवळ किंवा बाल्कनीमध्ये उभे असताना 9 मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, फ्लॅशलाइट किंवा मोबाईल फ्लॅशलाइट लावा. जेव्हा प्रत्येक व्यक्ती आजूबाजूला दिवा पेटवतो, तेव्हा आपल्यास प्रकाशाची ती महाशक्ती लक्षात येईल, ज्यामध्ये आपण सर्व एकाच हेतूसाठी लढा देत आहोत असं दिसेल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'कोरोना या जागतिक महामारीच्या काळात सुरु असलेल्या देशव्यापी लॉकडाउनला नऊ दिवस झाले आहेत. या वेळी, आपल्या सर्वांनी ज्या पद्धतीने शिस्त आणि सेवा सादर केली आहे ती अभूतपूर्व आहे. ही परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळण्यासाठी प्रशासन आणि लोकं प्रयत्न करत आहेत.'