नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रधान यांनी आपल्या नव्या प्रमोशनबाबत ट्विटरवर प्रतिक्रीया देताना लिहीले 'हे लोकशाहीचे बलस्थान आणि सौदर्य आहे की, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला (आम आदमी) इतकी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.' प्रधान यांच्या या प्रतिक्रीयेवर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, बहुतेकांनी त्यांच्या प्रतिक्रीयेवर चांगलीच फिरकी घेतली आहे. प्रधान यांच्या ट्विटवर प्रतिक्रीया देतान एका यूजरने लिहीले आहे की, काहीही सांगू नका. आम्हाला आपले बॅकग्राऊंड चांगलेच माहिती आहे. तुम्ही काही सामान्य वैगेरे व्यक्ती मुळीच नाही. जे तुम्ही सांगायचा प्रयत्न करत आहात.


प्रधान यांच्या आम आदमी प्रतिक्रियेवर एका यूजरने लिहीले आहे, आम्हाला सत्य माहिती आहे. आपले वडील वाजपेई सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. तरीही आपण सामान्य व्यक्ती आहात? हे तर घराणेशाहीचे उदाहरण आहे. किंवा तुम्ही वडीलांना विसरले आहात, असे या यूजरने म्हटले आहे.







दरम्यान, काही यूजर्सनी तर थेट स्क्रिनशॉटच शेअर केले आहेत. ज्यात धर्मेंद्र प्रधान यांचा माजी कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा असा उल्लेख आहे.