मुंबई : ऑप्टिकल इल्युजन संबंधीत फोटोंचा ट्रोंड सोशल मीडियावर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपल्याला दररोज असे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजेच अनेक प्रयत्न करुन देखील अनेकांना याचे उत्तर सापडत नाही. परंतु असे असले तरी, हे असे फोटो लोकांच्या मेंदूला चालना देतात. सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. तो एका जंगलातील फोटो आहे. या फोटोबद्दल सांगायचे झाले तर, आपल्याला एकाद्या घनदाट झाडी असलेल्या भागातील हा फोटो असल्याचे लक्षात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत झाडांच्या पाठी घरं दिसत आहेत. तर खाली जमीनीवरती सुकलेली झाडाची पानं पडली आहे. परंतु असं असलं तरी या फोटोमध्ये एक कुत्रा देखील लपला आहे. ज्याला शोधून काढण्याचं चॅलेंज दिलं गेलं आहे.


तुम्ही या फोटोकडे नीट पाहा आणि 20 सेकंदात यामध्ये लपलेला कुत्रा शोधून काढा.


हा फोटो तुमच्या स्मार्टनेसला चॅलेंज देत आहे. त्यामुळे तुम्ही हुशार असाल आणि तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर या फोटोमधून कुत्रा शोधून दाखवा.


पानांमध्ये बसलेला कुत्रा कोणालाच दिसत नाही. तुमच्या नजरेने त्याला पकडलं का? तुमचं उत्तर नाही असेल, तरी कळजी करु नका आम्ही त्याला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहोत.


पाहा इथे लपलाय कुत्रा



कुत्र्याचा हा रंग पानांच्या रंगाचा आहे, ज्यामुळे त्याला शोधण्यात अडचण येतेय, पण हा कुत्रा पानांमध्येच लपला आहे. आता तरी तुम्हाला या फोटोमध्ये कुत्रा दिसलाच असेल. आता हा फोटो आपल्या मित्रांनाही पाठवा आणि पाहा त्यांना यामध्ये कुत्रा शोधता येतोय का?