मुंबई : सध्या सोशल मीडियावर असे अनेक फोटो व्हायरल होत असतात, जे आपल्याला विचार करायला भाग पाडतात. लोकांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचा कन्टेन्ट पाहायला मिळतो. जो त्यांचं मनोरंजन करतो. शिवाय लोकांना कधीकधी आपल्या बुद्धीला चालना देणारं काम करायला आवडतं. त्यामुळे या संदर्भात देखील अनेक फोटो किंवा व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. जो सगळ्या लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. परंतु तासनं तास या फोटोकडे पाहिल्यानंतर देखील बऱ्याच लोकांना याचं उत्तर सापडलेलं नाहीय.


एका फेसबुक पेजवरुन एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये काही ग्लास एकमेकांना जोडले गेले आहेत आणि नळाचं पाणी त्या ग्लासमध्ये पडत आहे. या पेजने फोटो शेअर करताना लोकांना असा प्रश्न विचरला आहे की, सगळ्यात आधी कोणता ग्लास पाण्याने भरेल?


टोनीज पेज नावाच्या वापरकर्त्याने फेसबुकवर हा फोटो शेअर केला आहे आणि लोकांना प्रश्न विचारला, ज्याबद्दल इंटरनेटवरील इतर वापरकर्ते विचार करत आहेत.


या फोटोवर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स देखील केल्या आहेत. काहींना याचं उत्तरच सांगता आलेलं नाहीय, तर अनेकांनी आपआपल्या पद्धतीनं या फोटोचा तर्क लावून उत्तर दिलं आहे.



तुम्ही देखील हा फोटो नीट पाहा आणि तुम्हाला याचं उत्तर देता येतंय का ते पाहा. तुम्हाला जर याचं उत्तर सापडलं तर, तुमच्या मित्राला हा फोटो शेअर करा आणि त्यांनी विचार करायला भाग पाडा.