अहमदाबाद : गुजरात राज्यात सध्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. ग्राम पंचायत निवडणूक आली आणि त्यात भावकी आणि गावातलं बेरकी राजकारण आलं नाही असं होतंच नाही. यात 'गाव'करी ते 'राव'काय करी हे पुन्हा पुन्हा सिद्ध व्हायला उशीरही लागत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जेवढे रंग असतात, तेवढे रंग कोणत्याचं निवडणुकीत पाहायला मिळत नाही, अगदी उमेदवारी मिळवण्यापासून ते मतं मिळवण्यासाठी उमेदवाराला काय काय सोंगं करावी लागतात, प्रलोभनं द्यावी लागतात, नात्यांची पुन्हा आणि कोण कोणत्या मार्गांनी ओळख करुन द्यावी लागते, हे सांगायलाच नको.


सर्वात आठवणीत राहणारा आणि अतिशय रंजक निकाल लागला तो बलसाड जिल्ह्यातील वापी तालुक्यातील छरवाला ग्राम पंचायतीचा. यात वॉर्ड क्रमांक ५ मध्ये एका उमेदवारावर सर्वांसमोर रडण्याची वेळ आली. कारण या उमेदवाराचं कुटूंब होतं १२ सदस्यांचं आणि त्याला मतं मिळाली फक्त १.


यामुळे आपल्या सौभाग्यवतीनेही आपल्याला मत न दिल्यानं तो रडला, एकूण १२ जणांच्या कुटूंबात संतोषभाई हलपती यांचे हाल हाल झाले. कारण केवळ एक मत मिळाल्याने त्यांची मोठी नामुष्की झाली, संतोषभाई यांना निवडणूक तर जिंकता आली नाही, पण त्यांच्याशिवाय इतर दुसऱयाचं एकही मत जिंकता आलं नाही.