मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच मजेदार असतात तर काही व्हिडीओ हे आपल्याला बरंच काही शिकवून जातात. ऐवढंच नाही तर आपल्याला सोशल मीडियावर अशा काही इन्सीडंटचे व्हिडीओ समोर येतात जे आपल्या अंगावर काटा उभे करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो खूपच धक्कादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पाहिलं असेल की, डोंगराळ भागात बरेचसे अपघात होतात, यामागचं मुख्या कारण म्हणजे, तेथील वळणा-वळणाचे रस्ते. जे जास्त धोकादायक असतात. अशा वेळी जर तुमच्या वाहनाचा वेग वेगवान असेल, तर तुमचा अपघात होण्याची शक्यता खूप जास्त असते.


या संदर्भात एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यापूर्वी, यूट्यूबवर शेअर केलेला हा आश्चर्यकारक व्हिडीओ पाहा


या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे की, डोंगराच्या वळणदार रस्त्यावर एक कार अतिशय वेगाने धावत आहे. रस्त्यावरील रेलिंगला ही कार जोरात आदळते, जे पाहून तुम्ही हे मनातच विचार कराल की, आता ही गाडी खाली गेलीच. एवढ्या मोठ्या धडकेमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरले दिसत आहे. त्यामुळे पुढे काय घडलं हे जाणून समजायला वेळ लागतो. परंतु नंतर पुढे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, ही गाडी खाली दरीत न पडता रेलिंगलाच धडक देते.



अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडीओ जणू सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. इतकंच नाही तर आतापर्यंत सुमारे 1.9 हजार लोकांनी या रीलला लाईक केलं आहे. कारमध्ये बसलेली व्यक्ती सुदैवाने बचावली.