मुंबई : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात अनेक तरुण असतात. काही तरुणांना समोरून संधी मिळते. तर काही तरुण असलेली नोकरी बदलण्यासाठी खटपट करतात. पगारवाढ हे नोकरी बदलण्यामागचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरी स्विच करणाऱ्यांसाठी आणि नवीन नोकरी मिळवण्याच्या शोधात असलेल्यांसाठी या काही खास टिप्स महत्त्वाच्या आहेत. इथे जर गणित चुकलं तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. 


सर्वात कठीण मुलाखत असते ती HR सोबतची. कारण तिथे पगारावर निगोशिएट करणं जास्त कठीण असतं. मनासारखी सॅलरी मिळवणं आणि ती HR च्या हातून सुटणं फार कठीण असतं. त्यासाठी तुम्ही कोणत्या मुद्द्यांचा विचार करायला हवा आणि कशी आत्मविश्वासाने मुलाखत द्यायला हवी याबाबत आज जाणून घेऊया. 


तुमची क्षमता आणि कामाची कुवत ओळखून पगाराची मागणी करा. तुम्ही कंपनीला कसा फायदा मिळवून देऊ शकता हे HR ला पटवून द्या. त्यामुळे नेहमी कंपनीच्या फायद्याचा विचार करा. 


मुलाखतीवेळी तुमच्या अचीवमेंट्स आणि तुम्हाला मिळालेलं कामाचं अॅप्रीसिएशन या दोन्ही गोष्टी सांगायला विसरू नका. या दोन्ही गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजेत.


पगारासाठी बोलताना अडून राहू नका. तुमचा अनुभव आणि काम या दोन्ही गोष्टींवर ठाम राहा. तुम्ही तुमच्या पॅकेजवर ठाम राहाणं गरजेचं आहे. तुम्ही आधीच कमी केली तर HR आणि कंपनीसाठी फायदा आणि तुमच्यासाठी तोटा आहे. 


पगारासोबतच कंपनीकडून तुम्हाला कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत हे देखील जाणून घ्या. या गोष्टींची अगोदरच माहिती असणं गरजेचे आहे.