Viral News : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आजची तरूणाई आपला जीव धोक्यात घालत स्टंटबाजी करताना दिसते. कधी कधी ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवावर बेतल्याचं आपण पाहिलं आहे. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये तीन तरूण रेल्वे ट्रॅकवरून बाईक चालवताना दिसत आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रॅकवरून तरूण मुलं बाईक चालवत असून दुसरा एकजण त्यांचा व्हिडीओ शूट करत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर इथला आहे. जेव्हा हे तरूण रेल्वे रूळावरून गाडी चालवत होते तेव्हा जर रेल्वे आली असती तर तरूणांना रूळावरून बाजूला जाणं अवघड झालं असतं.




पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे व्हिडीओमधील तरूणांची ओळख पटवत त्यांच्यावर कारवाई केली. त्यासोबतच तरूण ज्या बाईकवर स्टंट करत होते ती बाईक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

यंदाच्या वर्षी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक बाईकस्वार रेल्वे रूळावरून जात होता. तितक्यात ट्रेन आली तेव्हा तरूण गाडी सोडून लांब पळाला. रेल्वेखाली बाईकचा चक्काचूर झाला होता. सुदैवाने तरूण बाईकपासून लांब गेला होता अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.