Police Station CCTV Viral Video: मध्य प्रदेशमधील कटनी येथील एका जीआरपी पोलीस स्टेशनमधील धक्कादायक प्रकाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कर्मचारी आणि महिला अधिकारी एका अल्पवयीन मुलाला आणि वयस्कर महिलेला दांड्याने मारहाण करताना दिसत आहे. दोन ते तीन पोलीस कर्मचारी 15 वर्षीय मुलाला जमीनीवर पाडून मारहाण करतात. त्यानंतर वयस्कर माहिलेला महिला पोलिस अधिकाऱ्याकडून मारहाण केली जाते. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


व्हिडीओमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये आधी एका 15 वर्षीय मुलाला जमीनीवर पाडून महिला अधिकाऱ्यासमोरच दांडक्याने मारहाण करण्यात आली. या मुलाच्या पायावर दंडुक्याने अनेक फटके मारण्यात आले. त्यानंतर पुरुष कर्मचारी या रुमबाहेर गेले आणि या मुलाच्या आईला आतमध्ये बोलावण्यात आलं. त्यानंतर महिला अधिकाऱ्याने रुमचा दरवाजा लावून दांडक्याने या महिलेला मारहाण केली. तिने केस पकडून या महिलेला खेचून जमीनीवर पाडलं. त्यानंतर या महिला अधिकाऱ्याने या मुलालाही दांडक्याने मारहाण केली.


काँग्रेसने पोस्ट केला व्हिडीओ


मध्य प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्री मोहन यादव यांना टॅग करुन, "मुख्यमंत्रीजी, मध्य प्रदेशमध्ये नेमकं काय सुरु आहे हे सांगण्याचं कष्ट घेणार आहात का? कायद्याच्या नावाखाली तुमचे पोलीस गुंडगिरी करुन सर्वसामान्यांच्या जीवावर उठली आहे," असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना काँग्रेसने, "कटनी जीआरपी पोलीस स्टेशन क्षेत्राअंतर्गत दलित कुटुंबातील 15 वर्ष्यी मुलगा आणि त्याच्या आईला पोलीस स्टेशन प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी दिलेली वागणूक मन विचलित करणारी आहे. प्रश्न असा आहे की या लोकांमध्ये ही हिंमत आली कुठून? तुमच्या उदासीनतेमुळे की तुम्ही अशी कृत्य करण्यासाठी सूट दिली आहे त्यामुळे त्यांची अशी हिंमत झाली?" असा सवाल काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना केला आहे. वयस्कर महिलेला मारहाण करणारी पोलीस अधिकारी ही पोलीस स्टेशनची प्रमुख असून तिचं नाव अरुणा वहानी असं आहे.



समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं नाव कुसुम वंशकार असून तिचा नातवालाही मारहाण करण्यात आली. भीम आर्मीचे संस्थापक आणि खासदार चंद्र शेखर आझाद यांनी हे दलित कुटुंब असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं आहे. "या दोघांना भाजपा सरकारच्या वर्दीतील गुंडांनी रुममध्ये बंद करुन एकमेकांसमोर मारहाण केली. हाच भाजपाच्या कुशानाचा खरा चेहरा असून दलित प्रेमाच्या नावाखाली कोणत्याही असहाय कुटुंबातील अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या आजीला उचून नेत वर्दीचा मिसाज दाखवायचा," असं चंद्र शेखर म्हणाले आहेत.


मुख्यमंत्री, राज्य संभाळता येत नसेल तर पद सोडा


"मुख्यमंत्री मोहन यादव तुम्हाला मध्य प्रदेश संभाळता येत नसेल तर तत्काळ राजीनामा द्या. कारण हे केवळ कटनीमध्ये नाही तर यापूर्वी सागर, सतना, नरसिंहपुर आणि अशोकनगरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. या घटना तुमची प्रशासकीय क्षमता आणि हेतूवर प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या आहेत," असं चंद्र शेखर यांनी म्हटलं आहे.



पोलिसांनी काय सांगितलं?


या प्रकरणावर सरकारकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जबलपूर रेल्वे एसपीने या प्रकरणावर एक पोस्ट करत हा व्हिडीओ ऑक्टोबर 2023 चा असल्याचं सांगितलं आहे. ज्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली त्या आरोपी दीपक वंशकारचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे. कटनीमध्ये दीपक वंशकारविरुद्ध 19  गुन्हे दाखल असून तो 2017 पासून फरार असल्याचं सांगितलं जात आहे. 


कारवाई


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांना कामावरुन निलंबित करण्यात आलं असून पोलीस पुढील तपास करत आहेत.