राज्यात शनिवारचा दिवस हा अपघातांचा (Accident) दिवस ठरला आहे. नाशिकमध्ये (nashik bus fire) अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर सांगलीतही (Sangli) एका चारचाकी गाडीला आग लागल्यानंतर एकाचा मृत्यू झालाय. दुसरीकडे नाशिक (nashik) वणी येथे एका एसटी बसने (ST Bus) अचानक पेट घेतला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अपघात हा कोणालाही आणि कुठेही होऊ शकतो. अपघात सांगून होत नाहीत, पण तो टाळण्यासाठी उपाय कराता येवू शकतात. अशा अनेक वेळा माणूसच अशा अपघातांना आमंत्रण देत असतो. जर या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना संबंधित अपघातापासून वाचवू शकता. यासोबतच कारला आग लागल्यास काय करावे हे देखील जाणून घ्या.


काही अपघातांवर मानवी नियंत्रण नसते, मात्र रस्त्यावरील अपघातांचे एक प्रमुख कारण निष्काळजीपणा मानला जातो. चालत्या कारमध्ये आग लागणे हे एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणाचे परिणाम देखील असू शकतो. 


वायरिंग गरम होऊन चिकटणे


उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढते तेव्हा कारमध्ये असलेल्या लहान वायर गरम होऊन चिकटून राहतात. त्याच वेळी, वायरवरील रबर गरम झाल्यावर स्पार्किंगमुळे शॉर्ट-सर्किटचा धोका वाढू शकतो. यामुळे गाडीला आग लागू शकते. त्याच वेळी, वायरच्या कनेक्शनमुळे शॉर्ट सर्किट देखील होऊ शकते, ज्यामुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो.


सर्व्हिस सेंटरमध्ये न जाता सामान्य मेकॅनिककडून काम करुन घेणे


फ्री सर्व्हिसिंग संपल्यानंतर लोक कोणत्याही मेकॅनिककडे जाऊन त्यांच्या वाहनांची सर्व्हिसिंग करून घेतात. अशावेळी अप्रशिक्षित मेकॅनिककडून काही चूक होऊन वाहनाला आग लागण्याची भीती आहे.


CNG/LGP किट अधिकृत ठिकाणाहून न घेणे


कारला आग लागण्याचे एक कारण म्हणजे CNG/LGP हे किट अधिकृत केंद्रातून बसवून न घेणे हे देखील आहे. त्यामुळे किट बसवताना गळतीची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे गाडीला आग लागू शकते. ज्या वेळी कंपनी  सीएनजी किट बसवते तेव्हा सिलिंडरवर Automatic Regulator आणि चेकवॉल बसवते. अशावेळी गळती किंवा इतर कोणतीही समस्या उद्भवल्यास चेकवॉल आपोआप उघडते आणि सिलिंडरमधून गॅस बाहेर पडतो, त्यामुळे मोठा अपघात होण्याचा धोका कमी होतो.


कारची योग्य काळजी न घेणे


कारचा अपघात टाळण्यासाठी वाहनाची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे. कारण खराब देखभालीमुळेदेखील गाडीला आग लागू शकते.


इंजिन ओव्हरहाटिंग


उष्णता आणि जास्त वेळ कार सतत चालवताना, इंजिन जास्त गरम होते. यामुळे कारमध्ये आग लागण्याचा धोका वाढू शकतो.


कार डिझाइनमध्ये दोष


कारच्या डिझाइनमधील दोष हे देखील कारला आग लागण्याचे कारण असू शकते.


का कार पकडते आग: कार क्रॅश झाल्यावर आग का लागते? अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल की अपघातामुळे कारला आग लागते (कारांना अपघात झाल्यावर आग का लागते). इंधन टाकी फुटल्यामुळे किंवा गळती झाल्यामुळे किंवा आतील शॉर्ट सर्किटमुळे हे घडते.


कारला आग लागल्यास काय करावे?


कारला आग लागताच ताबडतोब कारमधून बाहेर पडा आणि लांब व्हा.


अग्निशामक यंत्र वापरा 


 बॉनेट उघडणे टाळा


वाहतूक पोलिस आणि अग्निशमन विभागाशी त्वरित संपर्क साधा.