गुगल मॅप वापरत असाल सावधान; खातं होईल रिकामं
वाहन चालवताय नियमांचं पालन करणं बंधनकारक
नवी दिल्ली : आजच्या धावत्या युगात कोणत्याही पत्त्यावर पोहोचण्यासाठी गुगल मॅपचा सर्वात जास्त वापर केला जातो. यापूर्वी ठराविक पत्त्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला ठिक-ठिकाणी पत्ता विचारत जावं लागत होत. मात्र आता गुगल मॅपमुळे पत्त्यावर पोहोचलं अगदी सोपं झालं आहे. त्यामुळे आता गुगल मॅपचा वापर सर्वात जास्त होत आहे. पण आता तुम्ही दुचाकी किवा चारचाकी वाहन चालवत असात तर काही नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुमचा खिसा रिकामा होण्याची शक्यता आहे.
वाहन चालवत असताना जर तुम्ही हातात मोबाईल घेवून गुगल मॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. नेहमी वाहन चालक ड्रायव्हिंग करताना गुगल मॅपचं नेव्हिगेशन ऑन करतात. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी असेल तरी त्याची माहिती मॅपच्या माध्यमातून मिळते. हे सगळे गुगलचे फायदे आहेत पण काही तोटे देखील आहेत.
जर तुम्ही तुमच्या गाडीत डॅश बोर्डावर मोबाईल होल्डर लावला नसेल आणि हातात मोबाईल घेवून मॅपचा वापर करत असाल तर तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत दंड होवू शकतो. त्यामुळे आता गुगल मॅप वापरताता नियमांचं पालन करणं गरजेचं असणार आहे.
त्यामुळे जर तुम्ही वाहन चालवत असताना गुगल मॅपेचा वापर करत असाल, तर गाडीत मोबाईल होल्डर लावून घेणं बंधनकारक असणार आहे. मोबईल हातात घेवून ड्रायव्हिंग केल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.