ITR फाइल करण्याऱ्या करदात्यांसाठी महत्वाची बातमी; CBDT कडून मोठा दिलासा
ITR filing Latest Update इनकम टॅक्स रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, ITR दाखल केल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन करणे महत्वाचे असते.
मुंबई : 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न भरण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. यादरम्यान केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) मोठा दिलासा दिला आहे. CBDT ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी ई-फाइल केलेल्या ITR च्या व्हेरिफिकेशन अंतिम मुदत वाढवली आहे.
28 फेब्रुवारीपर्यंत ई-व्हेरिफिकेशन
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने ITR च्या व्हेरिफिकेशनची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवली आहे. आयकर रिटर्नची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला E-Verify करणे आवश्यक आहे. अन्यथा आयटीआर अवैध मानला जातो.
आर्थिक वर्ष 2020-21 साठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. सर्व करदात्यांनी 31 डिसेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.