नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरलेल्या लालू प्रसाद यादव यांना आज सुनावण्यात येणारी शिक्षा उद्यापर्यंत पुढं ढकलण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे ८९ लाख रूपयांच्या घोटाळाप्रकरणी लालू यादव यांना आज शिक्षा सुनावण्यात येणार होती. मात्र राष्ट्रीय जनता दल अध्यक्ष लालू यादव यांच्या हितचिंतकांकडून आपणाला फोन आल्याचं सांगत विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शिक्षा पुढं ढकलली. 


आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे शिक्षा सुनवायची की, प्रत्यक्ष कोर्टात, याचा फैसला आपण उद्याच घेऊ, असे सीबीआय न्यायाधीश शिवपाल सिंह यांनी सांगितलं.