नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहे. हे छापे का मारण्यात आले याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. पण मोहल्ला क्लिनिक भ्रष्टाचार प्रकरणात हा छापा मारला असल्याचं बोललं जातंय.


मनीष सियोदिया हे दिल्ली सरकारमधील सर्वात अधिक खाती असलेले मंत्री आहेत. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून अँटी करप्शन ब्यूरोला आपचे माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी दिलेल्या काही पुराव्यांवरुनही ही कारवाई केली गेली असेल असंही म्हटलं जात आहे. सीबीआयचे अधिकारी मनीष सिसोदिया यांच्या मथुरा रोड येथील सरकारी निवासस्थानी AB 17 येथे उपस्थित आहेत. घरातील कागदपत्रांची पाहणी सुरु आहे.