नवी दिल्ली : रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणात सीबीआयने माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या पटना येथील घरावर छापे टाकले. या वेळी सीबीआयने लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचीही ४ तास कसून चौकशी केली. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, छापे टाकलेल्या ठिकाणी सीबीआय अद्यापही चौकशी करत आहे.


IRCTCच्या हॉटेल लिलावात कथीत घोटाळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सीबीआयने यापूर्वीही लालू प्रसाद यादव यांची गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात चौकशी केली होती. तेजस्वी यादव यांच्यावर या प्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात खटला दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण IRCTCच्या हॉटेलच्या लिलावात झालेल्या कथीत घोटाळ्याशी संबंधीत आहे. दरम्यान, या प्रकरणात लालूंच्या परिवारातील अनेक सदस्यांची आणि काही ठिकाणांवर छापे टाकून सीबीआयने चौकशी केली आहे.



पदाचा गैरवापर केल्याचा आरोप


लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी घटनात्मक पदावर असताना व्यक्तिगत स्वार्थासाटी काही लोकांना थेट फायदा होईल असे वर्तन केले आणि पदाचा गैरवापर केला. त्यांच्यावरील आरोपानुसार रेल्वेमंत्री असतनाही त्यांनी बीएनआर रांची आणि बीएनआर पुरीचा ठेका एका खासगी हॉटेलकडे सोपवला. या प्रकरणात लालूंनी एका निनावी कंपनीच्या माध्यमातून तीन एक जमीनीची लाच घेतली. या हॉटेलचे नाव सुजाता हॉटेल असे आहे. ज्याची मालकी विनय आणि विजय कोचर यांच्याकडे आहे.