नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या चौकशी व्यवस्थेला अर्थात सीबीआयला भ्रष्टाचारानं किती पोखरून काढलंय याचं ढळढळीत उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय. सीबीआयनं स्वतःच सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. अस्थाना हे सीबीआय प्रमुख आलोक वर्मा यांच्या नंतरचे सर्वात मोठे अधिकारी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे अस्थाना यांनी दोन महिन्यांपूर्वी, केंद्रीय कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांनी २ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. सध्या केंद्रीय दक्षता आयोग सीबीआय प्रमुखांची चौकशी करत आहे.


त्यामुळे आता सीबीआयचे प्रमुख आणि उपप्रमुख दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. राकेश अस्थाना यांच्यासोबत उपअधीक्षक देवेंद्र कुमार, मनोज प्रसाद आणि सोमेश प्रसाद यांच्यावर कट रचणे आणि लाच घेण्याचा गुन्हा दाखल केलाय. सीबीआयच्या इतिहासात प्रथमच असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.