मुंबई: कोरोनाचे रुग्ण वाढत आहेतच पण त्याच सोबत दहावी बारावीच्या परीक्षाही जवळ येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही नियमावली आणि वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CBSE बोर्डानं आपल्या वेबसाईटवर याची संपूर्ण माहिती दिली आहे. ही माहिती विद्यार्थी cbse.nic.in या वेबसाईटला भेट देऊन पाहू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नव्या वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.


नव्या वेळापत्रकानुसार 12वीचा फिजिक्सचापेपर  13 मे ऐवजी 8 जूनला होणार आहे. याशिवाय इतिहास आणि बँकिंग पेपरची तारीखही बदलण्यात आली आहे. ही तारीख विद्यार्थ्यांना वेबसाईटवर देखील पाहता येणार आहे. 


दहावीच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. विज्ञानाचा पेपर 21 मे तर गणिताचा पेपर 2 जून रोजी होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा 2 वेळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. 


पहिल्या टप्प्यात ही 10.30 वाजता सुरु होऊन दुपारी 1.30 पर्यंत चालेल. सर्व उमेदवारांना सकाळी 10-10.15 च्या दरम्यान एक बुकलेट देण्यात येईल. तर दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा 2.30 ते 5.30 या वेळेत पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर 2.15 पर्य़ंत पोहोचणं अनिवार्य आहे. 


सीबीएसई बोर्डाची परीक्षा 4 मेपासून सुरू होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 7 जून रोजी तर 12 वीची परीक्षा 11 जूनपर्यंत संपेल अशी माहिती CBSE बोर्डाकडून देण्यात आली आहे.