मुंबई : सीबीएसईचा पेपर लीक झाल्याची घटना घडली आहे. दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या स्पेशल टीमने 25 हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. यासोबतच दिल्ली एनसीआरमध्ये 10 हून अधिक ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार, 10 वीच्या गणिताचा पेपर आणि 12 वीचा अर्थशास्त्राचा पेपर लिक झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला सीबीआयने सांगितलं की, या विषयांचे पेपर पुन्हा एकदा घेतले जाणार आहेत. मात्र याची तारीख अद्याप त्यांनी सांगितलेली नाही. बुधवारी 28 मार्च रोजी याची माहिती दिली आहे. 


अर्थशास्त्राचा पेपर लीक 


सोमवारी 26 मार्च रोजी सोशल मीडियावर अर्थशास्त्राचा पेपर लीक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्यामुळे 12 वीच्या सीबीआयच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ झाला आहे.