मुंबई : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रतलाम (Ratlam) येथील शिवमंदिरातून दोन चोरटे भगवान शिवाचे नाग आणि जलधारी चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना मनुनिया गावातील मनुनिया महादेव मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये डोकं झाकलेले आणि हातमोजे घातलेले दोन पुरुष भगवान शिवाचा नाग आणि जलधारीला काठीने घेऊन जातात. शिवलिंगाच्या सजावटीत वापरलेलं सोने-चांदीचे साहित्यही त्यांनी चोरले. तसेच, त्यांची नजर दानपेटीवर होती, मात्र त्या दानपेटीची चोरी करण्यात अपयशी ठरले. 


आणखी वाचा : लग्नाच्या 6 वर्षानंतर अभिनेत्रीचा घटस्फोट... 'आमचं लग्न वाचवण्याचा कोणताही मार्ग...'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

@KashifKakvi नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिलं, 'शिव भगवानचा नाग आणि जलधारी चोरांनी उडवली. मध्य प्रदेशातील रतलाम येथील शिव मंदिरातील सीसीटीव्ही. मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांची नजर असली तरी दोन्ही चोरट्यांना दानपेटीचे कुलूप तोडता न आल्याने त्यांना त्यात यश आलं नाही.' (Viral Video) 


आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक



आणखी वाचा : अक्षयसोबत लग्न मोडण्यावर रवीनानं उघड केलं कारण म्हणाली, 'मी माझ्या करिअरला न निवडता...'


(Trending Video) या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी ताल नगर येथे संप पुकारला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पाटीदार समाजानं एसडीएम मनीषा वास्के यांना निवेदन करत चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र, चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्रशासन आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. (cctv footage thieves enters in shiva temple and stole gold and silver naga and jaldhari)