श्रीनगर : रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी तीन संशयित दहशतवाद्यांचे फोटो जारी करण्यात आले आहे. श्रीनगरच्या लालचौक परिसरात रायझिंग काश्मीर या इंग्रजी दैनिकाचे संपादक शुजात बुखारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलीस तपासात तीन जणांनी अत्यंत जवळून गोळ्या झाडून बुखारींना ठार मारल्याचं पुढे आलंय. त्या तिघांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत. या हल्ल्यात बुखारींचे दोन अंगरक्षकही मारले गेले आहेत. 



दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत जम्मू काश्मीरच्या पुलवामामधून दहशतवाद्यांनी लष्कराच्या एका जवानाचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केलीय. अपहरण करण्यात आलेल्या जवानाचं नाव औरंगजेब असून तो पूँछ जिल्ह्याचा रहिवासी होते. औरंगजेब सुट्टीसाठी घरी आले होते.  रमजानच्या महिन्यात काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी केंद्र सरकरानं दहशतवाद्यांविरोधात कारवाई थांबवली आहे. दरम्यान याच कालावधीत काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.