नवी दिल्ली : बुधवारी संपूर्ण देशाला हादरवणारी एक घटना घडली. क्षणार्धातच 13 कुटुंब उध्वस्त झाली. तामिळनाडू येथे लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला. ज्यामध्ये देशाचे पहिले सीडीएस, अर्थात संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघात इतका भीषण होता, की त्याची दृश्य पाहून प्रत्येकाच्याच काळजात चर्रsss झालं. 



संपूर्ण वातावरण त्यावेळी अधिकच भावूक झालं, ज्यावेळी शहीद ब्रिगेडियर एलएस लिद्दड यांची मुलगी आश्ना हिच्या भावनांचा बांध फुटला. काही क्षण तिनं या पार्थिवाकडे पाहिलं आणि मोठ्या प्रेमानं त्याचं चुंबन घेत वडिलांना अखेरचा निरोप दिला. 


आश्नाच्या डोळ्यांतून वाहणारं पाणी काही केल्या थांबत नव्हतं. तिला पाहून प्रत्येकाच्याच काळजाला वेदना झाल्या होत्या. 


हेलिकॉप्टर अपघातामध्ये निधन पावलेल्या सर्वांनाच तिनही सैन्यदलांच्या प्रमुखांनी आदरांजली वाहिली. साऱ्या देशात या घटनेमुळे सध्या भावूक वातावरण आहे.