जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघात तैवानच्या लष्करप्रमुखांसारखा?
जनरल बिपीन रावत यांच्यासारखाच हेलिकॉप्टर अपघात, तैवानच्या लष्करप्रमुखांचाही... अपघातात काय होतं साधर्म्य, त्यांनीही दिलं होतं चीनला सडेतोड उत्तर
मुंबई: तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचा MI 17 वी 5 हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालं. हेलिकॉप्टर अपघातात रावत-त्यांच्या पत्नीसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जनरल बिपीन रावत यांच्या अपघातासारखाच वर्षभरापूर्वी हेलिकॉप्टर अपघात झाला होता.
वर्षभरापूर्वी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात तैवानचे लष्करप्रमुखांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये हेलिकॉप्टर अपघाताचं साधर्म्य असल्याचं सांगितलं जात आहे.
तमिळनाडूतील कुन्नूर इथे आर्मीच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि जवान होते. हेलिकॉप्टर अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे.
हवाई दलाने या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकीकडे भारत-चीन सीमावादावरून तणाव सुरू आहे. भारतासाठी ही एक आव्हानात्मक स्थिती आहे. लडाख आणि अरुणाचलच्या सीमेवरून चीन आणि भारतात वाटाघाटी सुरू आहेत.
चीनसोबतच्या 20 महिन्यांपासून सुरू असलेल्या सीमेवरील तणावामुळे युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली असताना, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत, त्यांची पत्नी आणि अन्य 11 लष्करी जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जनरल रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताने वर्षभरापूर्वीच्या घडलेल्या तैवानच्या हेलिकॉप्टर अपघाताची आठवण करून दिली. असं संरक्षण तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी आपलं मत व्यक्त केलं.
2020 मध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातासारखाच पुन्हा रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. वर्षभरापूर्वीच्या दुर्घटनेत लष्करप्रमुख शेन यी मिंग यांच्यासह 7 लोकांचा मृत्यू झाला होता.
तैवान लष्करप्रमुखांचा हा अपघात तैवानच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुका होण्यापूर्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. शेन एक उत्कृष्ट कमांडर होते. त्यांनी हवाई दलात आधिनिकीकरण व्हावं यासाठी अनेक प्रयत्न केले होते. त्यांचं हवाई दलातील योगदान खूप मोठं होतं.
लढाऊ विमानं अपग्रेड करणं, अत्याधुनिक F-16V विमान खरेदी करण्याची त्यांची योजना होती. त्यांनी एका गुप्त मिशनसाठी देखील काम सुरू केलं होतं. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकांपूर्वीच त्यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं.
या दोन्ही अपघातांचा एकमेकांशी संबंध जोडला गेल्यानंतर आता चीन मीडियाने संताप व्यक्त केला आहे. चीनला तैवानच्या प्रश्नात परकीय हस्तक्षेप नको आहे. त्यामुळे चीन मीडियामध्ये या प्रकरणावर संताप व्यक्त होत आहे.
आता तैवानचे लष्करप्रमुख आणि भारताच्या तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात बरेच साधर्म्य असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केला आहे.