CEL Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच तरुण स्पर्धा-परीक्षांची तयारी करायला घेतात. तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. येथे पदवीधर अथवा डिप्लोमाधारक उमेदवार अर्ज करु शकतात. अधिकृत वेबसाइटवर याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 23 नोव्हेबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीईएल भरती अंतर्गत ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट आणि तंत्रज्ञची रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिकृत वेबसाइट www.celindia.co.in वर याची अर्ज प्रक्रिया सुरु आहे. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारत सरकारच्या डिपार्टेंट ऑफ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या अंतर्गत येते. या विभागाला वेगवेगळ्या ग्रेड्ससाठी ज्युनिअर असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन्सची गरज आहे. याचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आलाय. 


ज्युनिअर टेक्निकल असिस्टंटच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून 3 वर्षाचा डिप्लोमा/बीएससीची डिग्री (मॅकेनिकल इंजिनीअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) असणे आवश्यक आहे. तंत्रज्ञ बी अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे दहावी किंवा त्या समकक्ष पात्रता हवी.सोबतच आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. दोन्ही पदांसाठी उमेदवारांकडे विशिष्ट अनुभव असणे गरजेचे आहे.


वयोमर्यादा


अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 वर्षांहून अधिक नसावे. वयाची गणना 31 ऑक्टोबर 2024 नुसार होईल. कमाल वयोमर्यादेत आरक्षित वर्गाला सवलत देण्यात आली आहे. ज्युनिअर टेक्नकल असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 22 हजार 250 ते 75 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. तर टेक्निशियन बी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 19 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट, डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल टेस्ट अशा माध्यमातून होणार आहे.


अर्जाची शेवटची तारीख


या पदांवर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी, एक्स सर्व्हिसमन यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार आहे. इतर इतरांसाठी 1 हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.इच्छुक आणि पात्र उमेदवार 22 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करु शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूवर्क वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा