मुंबई : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे. जनगणना २०२१  (Census 2021) एकूण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिला टप्पा  १ एप्रिल ते ३० डिसेंबर पर्यंत पार पडेल. या टप्प्याला 'हाउसहोल्ड लिस्टिंग' असे नाव देण्यात आले आहे. या टप्प्यांमध्ये घरातील मुख्य व्यक्ती कोण आहे? घरामध्ये कोणत्या सुविधा आहेत? किती व्यक्ती राहतात? असे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२१ मध्ये पार पडले आहे. या टप्प्यामध्ये वैयक्तिक प्रश्न विचारले जातील. २०२१ जनगणनेत ज्या भागात पोहोचणे कठीण असेल अशा ठिकाणी शासकिय अधिकारी हेलिकॉप्टरद्वारे पोहोचतील. २०११ साली देखील या मार्गाचा वापर करण्यात आला होता. पण यावेळी हा पर्यायाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. 


विचारले जातील असे प्रश्न
- घरामध्ये शैचालय कशा प्रकारचं आहे. 
- घर मालकाचा अन्य ठिकाणी देखील घर आहे का? 
- स्वयंपाक करण्यासाठी कोणतं साधण वापरता?
- मनोरंजनासाठी कोणतं माध्यम आहे. '(टीव्ही किंवा रेडिओ) ? 
- बँक खात्याबद्दल वैयक्तिक विचारणा करण्यात येईल. 


जनगणना करण्यासाठी पहिल्या टप्पात ३० कर्मचारी काम करतील. २०११ साली झालेल्या जनगणनेत एनपीआरला सोडून बाकी कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रूपयांचं मानधन देण्यात आलं होतं. परंतु यंदाच्या वर्षी हाऊसलिस्टिंग, जनगणनेचे काम आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला २५ हजार रूपयांचे मनधन देण्यात येणार आहे. 


तर, जनगणनेचे काम गृह मंत्रालयाअंतर्गत येते. यंदा डिजिटल जनगणनेचा डेटा नोंद करण्यासाठी मोबाईल वापरता येणार आहे. तसंच हा डेटा कर्मचाऱ्याला जनगणना विभागाकडे मोबाइलवरूनच हस्तांतरित करता येईल. नव्या हायटेक पद्धतीने जनगणनेचे काम वेगवान आणि अधिक सखोल होईल असं म्हटलं जात आहे.