मुंबई : देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in India)  कोरोनाला  (Coronavirus ) रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनीही पावले उचण्यास सुरु केली आहे. त्यानंतर कोरोना लसीकरणावर (COVID vaccine) भर देण्यात आला आहे. आता केंद्र सरकारने अनेक राज्यांची मागणी लक्षात घेऊन 18 वर्षांवरील सर्वांना 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. आता लस कमी पडू नये म्हणून सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. लस ( vaccine) संदर्भात केंद्राने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यानुसार 100 टक्के आगाऊ रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांची ही रक्कम सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे (Serum Institute and Bharat Biotech) जमा करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 कोरोनाच्या वाढत्या घटनांत वाढ होत असल्याने सरकार कोरोना लसीसंदर्भात (COVID vaccine) मोठा निर्णय घेतला आहे  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत भारत बायोटेक या लस तयार कंपन्यांना दोन महिन्यांसाठी 100 टक्के आगाऊ रक्कम दिली आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार केंद्र सरकारने दोन्ही कंपन्यांना एकूण 4 हजार 500 कोटी रुपये दिले आहेत. कोरोना लसीची मागणी देशात वाढत आहे. दरम्यान, बरीच राज्ये या लसीबाबत आधीच चर्चा करीत आहेत. (Center's Important decision on vaccine, 100 percent advance for 2 months to Serum Institute and Bharat Biotech)


केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत  बायोटेक या लस बनविणाऱ्या कंपन्यांना दोन महिन्यांची आगावू रक्कम दिली आहे. त्याअंतर्गत कोविशील्ड उत्पादन करणार्‍या सीरम संस्थेला 3,000 कोटी रुपये आणि कोवाक्सिन उत्पादक भारत बायोटेकला 1500 कोटी रुपये देण्यात आले आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने बंगळुरु येथील भारत बायोटेकच्या सुविधेसाठी 65 कोटी अनुदान मंजूर केले