Railways and Bank Jobs : 10 वी पास आहात? मग बँकपासून ते रेल्वेपर्यंत इथे करा लगेच अप्लाय, जाणून घ्या डिटेल्स
Railways and Bank Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी असून इयत्ता दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत आणि बँकेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
Central Bank and Central railway mega Recruitment : केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काळजी करु नका. कारण बँकेत आणि रेल्वेत तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 10वी पास तरुणांसाठी रेल्वे आणि बँकांमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 10वी उत्तीर्ण लोकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. जबलपूर येथील रेल्वे आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण जाणून घ्या.
मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. या पदाला उप कर्मचारी असं म्हणतात. यासाठी 20 डिसेंबर 2023 रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2024 आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 जागा रिक्त आहेत.
तसेच 10वी उत्तीर्ण उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कामगाराच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या कामाचे ठिकाण मुंबईत असून या नोकरीसाठी केवळ अनुभवी उमेदवारच अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवार बँकेच्या www.centralbankofindia.co.in या ऑनलाइन वेबसाइटला भेट देऊ शकतात.
हे सुद्धा वाचा : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
तर मध्य प्रदेशातील जबलपूर येथे पश्चिम मध्य रेल्वेने शिकाऊ पदासाठी भरती सुरू केली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. या पदासाठी अनुभवी उमेदवारच अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार 15 डिसेंबर 2023 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान अर्ज करू शकतात.
रेल्वे आणि बँकेत नोकरी
पश्चिम मध्य रेल्वेच्या अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2023/ ला भेट देऊ शकता किंवा थेट वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करू शकता. या पदासाठी 3015 रिक्त जागांची माहिती देण्यात आली आहे. 14 जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.