VIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक

zomato delivery boy : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरस होत आहे. यामध्ये एक झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊव ग्राहकाच्या घरी ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. या व्हिडीओ अनेकजण  अचंबिचत होऊन बघत आहेत.  

श्वेता चव्हाण | Updated: Jan 3, 2024, 12:42 PM IST
VIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक title=

zomato delivery boy viral video : तेलंगणातील हैदराबादमध्ये असलेल्या चंचलगुडा भागातून एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय  घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांची ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या डिलिव्हरी बॉयला ग्राहकांची ऑर्डर्स पोहचवण्यासाठी घोडस्वारी का करावी लागली? 

यावर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी  झोमॅटो डिलिव्हरी बॉयला विचारलं, त्यावर तो म्हणाला की, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास उशीर लागत होता. म्हणून त्याला घोड्यावरुन डिलिव्हरी करणे योग्य वाटले असं झोमॅटो डिलिव्हरी बॉयने सांगितले. 

व्हायरल क्लिपमध्ये, लाल रंगाचे झोमॅटो टी-शर्ट आउटफिट करुन पाठीवर डिलिव्हरी बॅग असलेला एक माणूस घोडेस्वार करताना दिसून आला. व्हिडिओमध्ये डिलिव्हरी एका प्रवाशाशी बोलताना दिसून येत आहे. यामध्ये तो म्हणतो पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल संपल्यामुळे त्याने डिलिव्हरीसाठी घोड्यावर जाण्याता पर्याय निवडला. काय झाले विचारल्यावर घोडेस्वार उतरला, पेट्रोल नहीं मिला भाई, तीन घंटे लाइन मे खडा राहा. झोमॅटो से निकल गया... पेट्रोल  नहीं मिला... 

काही दिवसांपूर्वीच हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले. ज्यामध्ये 7 लाख रुपयांचे दंड आणि 10 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो. या कायद्याविरोधात गेल्या मंगळवारी ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देशव्यापी संप पुकारला आणि देशव्यापी बस आणि ट्रकचा चक्काजाम झाला. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा: वाहनचालकांनी संप मागे घेताच किती बदलले पेट्रोल-डिझेलचे दर? कुठं जाणवतोय इंधन तुटवडा?  

परिणाणी कुठे खाद्यपदार्थांचा पुरवठा ठप्प झाला आहे तर कुठे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे अनेक पेट्रोल पंपावर वाहन्यांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. त्यानंतर सरकारने  या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार नसल्याचे जाहीर केले. याचदरम्यान, झोमॅटो बॉयचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.