नवी दिल्ली : तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खुशखबरी ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर करू शकतं. मीडिया रिपोर्टसनुसार, अर्थ मंत्रालय केंद्रीय कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन १८,००० वरून २१,००० करण्याच्या विचारात आहे. यापूर्वी केंद्र सरकारनं सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन १८,००० रुपये प्रती महिना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. तर उच्च स्तरावर हे वेतना २.५ लाख रुपये आहे. 


या निर्णयामुळे वेतनात असलेली असमानता काही प्रमाणात दूर होण्यास मदत होईल. गरिबी दूर करण्यासाठी हा एक चांगला उपाय ठरू शकेल, असंही सरकारला वाटतंय.