Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची बँक खातेधारकांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. सर्वसामान्य जनतेला बँकिग आणखी सोपी व्हावी, यासाठी अर्थमंत्यांनी मोठं पाउल उचललंय. बँकिंग सिस्टम Banking System India आणखी सोपी करा, जेणेकरुन खातेधारकांचा बँकिग व्यवहार करण्याचा कळ आणखी वाढेल, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं. तसेच खातेधारकांना अधिकाअधिक सुविधा देण्यावर भर द्या, ज्यामुळे ज्यांना कर्ज हवंय त्यांचा मार्ग सुकर होईल, असंही अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. (central finance minister nirmala sitharaman on cusomer friendly banking system)
अर्थमंत्र्यांचा सल्ला
खातेधारकांना कर्ज देण्याचे निकष योग्य असायला हवेत, असा सल्ला अर्थमंत्र्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्र्यांची उद्योग प्रतिनिधिंसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अर्थमंत्र्यांनी हा सल्ला दिला. अर्थमंत्र्यांनी या बैठकीत ग्राहकांना अंशत: सुविधा देण्याची बाबीची अंमलबजावणी करा, असे आदेश बँकांना दिले. यामुळे एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीयसह सर्वच बँक खातेधारकांना फायदा होणार आहे.
खातेधारक प्रथम
बँकेने खातेधारकांशी अधिकाधिक अनुकूल व्यवहार ठेवण्याची गरज आहे. मात्र जोखीम घेण्याइतपत ही बँकेचे खातेधारकांशी चांगले व्यवहार नसावं. पण ग्राहकांची सोय लक्षात घेऊन शक्य तितकं मैत्रीपूर्ण राहणे आवश्यक आहे", असं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं.