Pension Scheme : केंद्र सरकार दर महिन्याला देणार इतकी` रक्कम
या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणत्याही बँकेत बचत खातं (Bank Saving Account) असायला हवं.
मुंबई : केंद्र सरकार (Central Government) अनेक योजनांद्वारे (Central Government Scheme) समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत करत असते. आम्ही तुम्हाला आज एका स्कीमबाबत सांगणार आहोत, ज्याद्वारे सरकार तुमच्या खात्यात दरमहा 5 हजार रुपये जमा करेल. या योजनेनुसार गुंतवणूकदाराला (Investor) आयुष्यभर पैसे (Money) मिळतील. अटल पेन्शल योजना (Atal Pension yojana) असं या योजनेचं नाव आहे. (central government apy atal pension yojana scheme investor give 5 thousand rupees per month after 60 years)
या योजनेच्या नियमांमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ तेच घेऊ शकतात, जे करधारक (Tax Payers) नाहीत. या योजनेसाठी 18-40 वर्षांमधील व्यक्तीच गुंतवणूक करु शकतात. सरकार या योजनेद्वारे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1 ते 5 हजार रुपये पेन्शन म्हणून देते. पेन्शनचा आकडा हा गुंतवणूकीच्या रक्कमेवरुन ठरतो.
या योजनेचा हफ्ता भरण्यासाठी एकूण मासिक, त्रैमासिक आणि सहामाही असे 3 पर्याय आहेत. जर 5 हजार रुपये दरमहिन्याला पेन्शन हवी असेल, तर वयाच्या 18 व्या वर्षापासून दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील. तर वयाच्या 24 वर्षांपासून गुंतवणूकीला सुरुवात केल्याल दरमहा 346 रुपयांचं योगदान द्यावं लागेल.
अटल पेन्शन योजनेबाबत थोडक्यात
अटल पेन्शन ही एक सरकारी योजना आहे. यात गुंतवणूक आणि वय या 2 निकषांद्वारे पेन्शन किती मिळणार हे ठरवलं जातं. या योजनेची सुरुवात 2015 पासून करण्यात आली आहे. तसेच एखाद्या गुंतवणूकदाराचा वयाच्या 60 व्या वर्षाआधीच मृत्यूनंतर त्याच्या उत्तराधिकाऱ्याला (Nominee) रक्कम दिली जाईल.
या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणत्याही बँकेत बचत खातं असायला हवं. तिथे APY रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. तसेच आधार आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागले. त्यानंतर दरमहा खात्यातून ठरावक रक्कम कापली जाईल.