Fact Chek : केंद्र सरकार (Central Government) देशातील तरुणांना 3 हजार 400 रुपये देणार आहे. एक लिंक मोबाईलवर (Mobile Link) पाठवली जाते, त्या लिंकमधील माहिती भरल्यावर पैसे खात्यात जमा होणार असा दावा एका मेसेजमध्ये (Message) करण्यात आला आहे. हा दावा केल्यानं तरुणांना उत्सुकता आहे की खरंच पैसे मिळतात का? पैसे मिळणार असतील तर वयोमर्यादा काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याने आम्ही या मेसेजची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल मेसेज
प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या सर्व तरुणांना 3400 रुपये मिळणार. लिंकवर जाऊन नोंदणी केल्यास खात्यात पैसे जमा होतात. हा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांनी लिंकवर जाऊन माहिती टाकली. पण, अजून पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...


व्हायरल पोलखोल
केंद्र सरकार तरुणांना पैसे देणार असल्याचा मेसेज खोटा
मोबाईलवर पाठवलेली लिंक उघडून पाहू नका
लिंकच्या माध्यमातून तुमचा डेटा चोरी होऊ शकतो
लिंक उघडून पाहण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं जातं 



त्यामुळे तुम्हाला जर अशा आशयाचा मेसेज आला तर ती लिंक उघडू नका. कारण, असे मेसेज पाठवून तुमच्याच खात्यातील पैशांवर डल्ला मारण्याचा डाव गुन्हेगारांचा असतो. आमच्या पडताळणीत तरुणांना केंद्र सरकार 3 हजार 400 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे.