मुंबई :  देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus in India) वाढत्या संक्रमणादरम्यान केंद्र सरकारने आपली तिजोरी राज्यांसाठी उघडली आहे. वित्त मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) सन 2021-22 या वर्षाचा पहिला हप्ता 8873.6 कोटी रुपयात जाहीर करण्यात आला आहे. (Central government gives relief to states amid Corona crisis, first installment of 8873 crores released)


कोविडविरोधी लढाईसाठी निम्मी रक्कम खर्च


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 (Covid-19) प्रतिबंधात्मक उपायांसाठी राज्ये या रकमेपैकी 50 टक्के म्हणजेच सुमारे 4436.8 कोटी रुपये वापरु शकतात. यामध्ये रुग्णसेवा, थर्मल स्कॅनर, चाचणी केंद्रे आणि चाचणी किट खरेदी करण्याबरोबरच रूग्णालय, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उत्पादन आणि साठवण संयंत्रांचा खर्च भागविण्याचा यात समावेश आहे.



गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरुन रक्कम


केंद्रीय गृह मंत्रालयाच्या (MHA)सूचनेनुसार 8873.6 कोटींची रक्कम राज्यांना देण्यात आली आहे. असे सांगितले जाते की, सर्वसाधारणपणे, एसडीआरएफचा पहिला हप्ता वित्त महिन्याच्या शिफारशीनुसार जून महिन्यात जारी केला गेला होता, परंतु यावेळी यापूर्वी तो देण्यात आला आहे.


मागील वर्षाच्या प्रमाणाशिवाय नवीन रक्कम जाहीर 


पीआयबीने (PIB)जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ही प्रक्रिया सर्वसाधारण प्रक्रियेत शिथिल करुन एसडीआरएफसाठी देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्यांना देण्यात आलेल्या रकमेच्या वापराच्या दाखल्याची वाट न पाहता ही रक्कमही जाहीर करण्यात आली आहे.