कौशल्य विकास कोणाचा झाला? सरकारला पत्ताच नाही
मोठा गाजावाज करत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील तरुणांसाठी कौशल्य विकास योजना सुरु केली.. मात्र तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.
मुंबई : मोठा गाजावाज करत केंद्र सरकारने ग्रामीण भागातील तरुणांसाठी कौशल्य विकास योजना सुरु केली.. मात्र तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या योजनेबाबत शंका निर्माण झाली आहे.
योजना सुरु झाल्यापासून गेल्या तीन वर्षांत या योजनेचा लाभ किती तरुणांना झाला याची माहितीचं सरकारकडे नाही, त्यामुळे खरचं ही योजना अंमलात आणली गेली का हा प्रश्न आहे.
कौशल्य विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र, सरकारला सत्तेत येऊन सुमारे साडेतीन वर्षे उलटून गेली. मात्र, या योजने अंतर्गत नेमका कोणाचा कौशल्या विकास झाला या प्रश्नाचे उत्तर मात्र सरकारकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारची ही योजना केवळ कागदी घोडेस्वारी झाली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.