Post Office : पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ
केंद्र सरकारने (Central Government) याच पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात (Intrest Rate) वाढ करत सर्वसामान्य गंतुवणूकदारांना आंनदाची बातमी दिली आहे.
Post Office : पोस्ट ऑफिसच्या (Post Office Scheme) योजनांकडे सर्वसामांन्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहिलं जातं. या योजनांमध्ये जोखीम नाहीच्या बरोबर असते. तसेच परतावाही चांगला असतो. त्यामुळे अनेकांचा कळ हा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकीचा (Investment) असतो. केंद्र सरकारने (Central Government) याच पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात (Intrest Rate) वाढ करत सर्वसामान्य गंतुवणूकदारांना आंनदाची बातमी दिली आहे. मात्र केंद्र सरकारने सर्व स्मॉल सेविंग स्कीम्सच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. (central government incersed intrest rate in kvp scss kisan vikas patra post office monthly income)
केंद्र सरकारने 2 आणि 3 वर्षांची मुदत असलेल्या योजना, सीनियर सीटीझन सेविंग स्कीम (Senior Citizen Savings scheme -SCSS), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra -KVP) आणि पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनांच्या (Post Office Monthly Income) व्याजदरात वाढ केली आहे.
मंथली इनकम स्कीम
मासिक उत्पन्न योजना (MIS) अंतर्गत गुंतवणूकदारांना व्याजदरात 10 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता या योजनेत 6.7 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी 6.6 टक्के व्याज मिळत होतं.
किसान विकास पत्र
सरकारने किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra– KVP) योजनेवरील व्याजातही वाढ केली आहे. आता या योजनेअंतर्गत 123 महिन्यांच्या मॅच्युरिटीवर 7 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी 124 महिन्यांसाठी 6.9 टक्के व्याजदर दिला जात होता.
सीनियर सिटीझन
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर Senior Citizen Savings scheme – SCSC) 7.6 टक्के व्याज मिळेल. हा व्याजदर आधी7.4 टक्के होता.
PPF, NSC आणि सुकन्या समृद्धी योजना
केंद्र सरकारने PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यासोबतच पोस्ट ऑफिस बचत ठेव योजना, 1 वर्षाची मुदत ठेव, 5 वर्षाची मुदत ठेव आणि पोस्ट ऑफिस आरडी योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.