CORONA ALERT : `स्वत: डॉक्टर बनू नका` केंद्र सरकारकडून नवी गाईडलाईन्स जारी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी केंद्र सरकारने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट काहीशी कमी होतेय. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला असून लहान मुलांना धोका असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी विशेष प्लॅनिंग करण्यात येत आहे.
केंद्र सरकारची नवी गाईडलाईन
केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात वयस्क माणसांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं लहान मुलांवर वापरू नये असं स्पष्ट सांगितलं आहे.
'स्वत: डॉक्टर बनू नका' केंद्र सरकारचा सल्ला
सरकारने बुधवारी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत वयस्क रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या आयवरमेक्टिन, हायड्राक्सीलोरोक्वीन, फेविपिरावीरसारख्या औषधं आणि ड्रॉक्सीसायक्विन, एजिथ्रोमायसिनसारख्या औषधांचा वापर उपचारात न करण्याचा सल्ला दिला आहे. तसंच स्वत: डॉक्टर बनू नका, एक चूक महागात पडेल अशा शब्दामध्ये केंद्र सरकारने सल्ला दिला आहे.
डॉक्टरांच्या सल्लाशिवाय औषधं देऊ नका
लहान मुलांमध्ये काही लक्षण दिल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कोणतंही औषधं देऊ नका, हे धोकादायक आणि जीवघेणं ठरू शकतं असं केंद्राने म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या मेसेज पाहून काही जण घरीच प्रयोग करतात. पण असं न करता सावधानता बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
कोविड सेंटरची संख्या वाढवण्याची गरज
लहान मुलांच्या आरोग्यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या कोविड सेंटरची संख्या आणखी वाढवायला हवी. या केंद्रात लहान मुलांशी निगडीत वैद्यकीय उपकरणं आणि औषधं यांची गरज भासणार आहे. त्यासाठी राज्यांनी तयारी करून ठेवायला हवी. अशी माहिती केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे .