नवी दिल्ली : खोट्या आणि आकर्षक जाहिरांतींवर दंड ठोठावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्वचा उजळने, उंची वाढणे, केसांची गळती रोखा, शरीरसंबंधाबाबत दावे करणाऱ्या आक्षेपार्ह जाहिराती केल्यास आता ५० लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या खोट्या जाहिराती दाखवून सामान्य माणसांची दिशाभूल करण्याऱ्या जाहिराती रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवा कायदा आणला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोट्या जाहिराती रोखण्यासाठी आधीच कायदा अस्तित्वात आहे.  आक्षेपार्ह जाहिराती १९५४ च्या कायद्यामध्ये आता दुरुस्ती करून तो कायदा नव्याने मंजूर करून घेण्यात येणार आहे. जुन्या कायद्यात काही आजारांच्या जाहिरांतींवर बंदी होती पण आता या कद्यामध्ये आणखी नव्या आजारांचा समावेश केला आहे. 


गोरे होणे, अकाली वृद्धत्व दूर करणे, एड्स बरा करणे, स्मरण शक्ती वाढवणे, उंची वाढवणे, लिंग वृद्धिचा दावा, केस गळती रोखणे, मानसिक आजारातून बरे करणे, आनुवंशिक आजार आदी आजारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता खोट्या जाहिराती दाखवून सर्वसामान्यांची दिशाभूल करणऱ्यांवर सरकार दंड ठोठावणार आहे. 


खोट्या आणि आकर्षक जाहिराती दाखवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने योग्य त्या हालचाली सुरू केल्या आहेत. पहिल्यांदा गुन्हा केल्यास दोन वर्षांची शिक्षा किंवा दहा लाखांचा दंड ठोठावण्यात येईल. तर दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास पाच वर्षांची शिक्षा आणि ५० लाखापर्यंतचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.