मुंबई : राजकीय वर्तुळातून (Political News) या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची पुन्हा एकदा तब्येत बिघडली आहे. एका कार्यक्रमात गडकरींची प्रकृती खालावली. गडकरी रस्ते उद्धाटनाच्या कार्यक्रमात पोहचले. तिथे ते चहा घेत होते. त्या दरम्यान गडकरींची तब्येत बिघडली. यानंतर गडकरींवर डॉक्टरांनी उपचार केले. (central minister nitin gadkari sick at west bengal during to launch event at  siliguri)


नक्की काय झालं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरी पश्चिम बंगालमधील सिलीगुडीत रस्त्याच्या उद्घाटनासाठी पोहचले होते. यावेळेस गडकरींनी प्रकृती खालावली. 


गडकरींची तब्येत आता कशी?


भाजपचे खासदार राजू बिस्टा यांच्या निवासस्थानी गडकरींवर उपचार सुरु आहेत. गडकरींवर 3 डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून आहे. गडकरींची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. गडकरींना लवकरच दिल्लीचा आणलं जाऊ शकतं.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गडकरींच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच बॅनर्जी यांनी आवश्यक ते सर्व उपचार देण्याचे आदेश सिलीगुडीच्या आयुक्तांना दिले आहेत. 


दरम्यान गडकरींची तब्येत बिघडण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी गडकरी 2018 मध्ये अहमदनगरमधील एका कार्यक्रमात बेशुद्ध झाले होते. तसेच एप्रिल 2010 मध्ये गडकरी भोवळ येऊन पडले होते.