नवी दिल्ली :  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झालीय.याबाबत ट्विट करून त्यांनी माहिती दिलीय. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकानं टेस्ट करून घेण्याचं आवाहन इराणी यांनी केलं. बिहारमध्ये प्रचारसभांमध्ये इराणी सक्रिय होत्या. गुजरातमध्येही पोटनिवडणुकांसाठी त्या सतत प्रचारात होत्या. गुजरातमध्ये वडोदऱ्यात आणि बिहारच्या बिकराममध्ये त्या प्रचारासाठी गेलेल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतातील बर्‍याच राज्यात सणाच्या हंगामामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सणांमुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या पाच आठवड्यांत कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
 
राज्यात काल कोरोनाचे ६,७३८ नवे रुग्ण आढळले आहे. तर८,४३० र ुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात कालपर्यंत एकूण १४॰८६,९२६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे ८९.५३% एवढे झाले आहे. 



राज्यात कालपर्यंत ९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६२% एवढा आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,५४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


 देशभरात coronvirus कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांच्या पुढं तरीही किमान काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा शंभर दिवसांच्याही पलीकडे गेलेला असतानाच इथं महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय सोअनेक आव्हानं उभी करत असतानाच काहीसा दिलासाही मिळू लागला आहे. पूर्णणे नसला मवारी मागील तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंदही करण्यात आली आहे.