CET Exams 2023: मोठी बातमी! सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कधी होणार परीक्षा...
CET Exams : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाणून घ्या या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक...
MHT CET 2023: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत त्यांनी या अधिकृत वेबसाइट mahacet.org वरून जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच MHT CET 2023 ची परीक्षा 9 मे 2023 पासून होणार आहे.
अभियांत्रिकी, कृषी, बी, फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिल, तर एलएलबी 2 आणि 3 मेला परीक्षा होणार आहे.
पाहा परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक
MHT CET विषय
PCM - परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान
PCB- 15 ते 20 मे या कालावधीपर्यंत
CET परीक्षा
MBA/MMS- परीक्षा 18 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.
MAH LLB 5 वर्षे- 1 एप्रिल 2023
MAH LLB 3 वर्षे - 2 मे आणि 3 मे 2023
B.A./B.Sc. B.Ed.(चार वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम) - 2 एप्रिल 2023
वाचा: सोने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
दरम्यान अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसोबत, महाराष्ट्र राज्य सेल कायदा, कला, बीएड आणि इतर विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी आयोजित करते.
MHT CET 2023: परीक्षेसाठी अर्ज
राज्य सेलने MHT CET 2023 परीक्षेची तारीख जाहीर केल्यामुळे उमेदवारांना नोंदणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध सहभागी महाविद्यालयांमध्ये बीई आणि बीटेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी परीक्षा घेतली जाते आणि उमेदवारांना सीईटी परीक्षेत इयत्ता 11वी आणि 12वी अभ्यासक्रमातील प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक असतात.