Chacha Bhatiji Love Story: एक अजब प्रेमकहाणी (LoveStory) चर्चेत आली आहे. काका स्वतःच्याच पुतणीच्या प्रेमात पडला त्यानंतर घरच्यांच्या सहमतीने दोघांनी लग्न केले. मात्र आता गावकऱ्यांनी यावर आक्षेप घेतला होता. उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात ही आगळीवेगळी घटना घडली आहे. (Love Story News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभम असं तरुणाचे नाव असून त्याचीच पुतणी रियाच्या प्रेमात पडला होता. मात्र दोघेही नात्यात असल्याने त्यांने कोणालाही याबाबत कल्पना दिली आहे. काही दिवसांनी त्याने रियाकडे त्याचे प्रेम व्यक्त केले. तिनेही त्याला होकार दिला. अनेक वर्षे हे दोघे नात्यात होते. त्याच्या प्रेमाची खबर कुटुंबीयांना लागल्यावर त्यांनी त्यांच्या नात्यावर आक्षेप घेतला. 


दोघांच्याही नात्याला कुटुंबीयांचा विरोध कायम होता. मात्र शुभम आणि रिया दोघांनीही हार मानली नाही. दोघंही लग्न करण्यावर अडून राहिले. त्यांच्या हट्टाला बळी पडत अखेर त्यांच्या लग्नाला तयार झाले. गावातीलच हनुमान मंदिरात दोन्ही कुटुंबीयांच्या साक्षीने त्यांचे लग्न पार पडले. मात्र, लग्न झाले तरीही त्यांच्या नात्याला होत असलेला विरोध काही थांबण्याची चिन्हे नाहीत. 


हनुमान मंदिरात दोघांचे लग्न लावण्यात आले होते. या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, काकांने पुतणीसोबतच लग्न केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे चुकीचे असल्याचे म्हणत दोघांवरही टीका केली आहे. 


लग्न लागल्यानंतर शुभमने प्रतिक्रिया दिली आहे, मी गेल्या तीन वर्षांपासून रियाच्या प्रेमात आहे. आम्हाला लग्न करायचे होते. रिया माझी पुतणी आहे. आणि आम्ही स्व मर्जीने हे लग्न करत आहोत. आमच्यावर कोणाचाही दबाव नाहीये, असं त्याने म्हटलं आहे. 


शुभम आणि रियाच्या लग्नावर गावकऱ्यांनी व स्थानिक रहिवाशांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे लग्न हिंदू धर्माविरुद्ध आहे, असं म्हणत त्यांनी या लग्नाचा निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर हिंदू धर्मानुसार पुतणीही मुलीसमान असते. त्यामुळं आम्ही हे लग्न मानत नाही, असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे. 


गावातील काही स्थानिक रहिवाशांच्या मते, हे लग्न आमच्या कल्पनेपलीकडचे आहे. आजपर्यंत आमच्या रिती-रिवाजांमध्ये असं काही घडलं नव्हतं.