सियाचीन : रक्त गोठवणाऱ्या वातावरणामध्येही भारतीय सैन्यातील जवान देशाच्या सीमांचं संरक्षण करतात. त्यांच्यापुढे येणारी आव्हानं आणि त्या ठिकाणी असणारी परिस्थिती या साऱ्या वातावरणामध्ये जवानांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्येही अशा काही परिस्थितीचा सामना करावा लागो ज्याची साधी कल्पनाही आपण करु शकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी न्यूज'च्या प्रतिनिधींनी सैन्यदलाच्या याच जवानांची थेट घेत तेथील परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तापमानाचा पारा सातत्याने खाली जात असणारा हा भाग म्हणजे सियाचीन ग्लेशियर. या भागामध्ये खाण्यापिण्याची सामग्रीसुद्धा गोठली जात असल्याची बाब समोर आली आहे. फक्त खाद्यपदार्थांच्याच बाबतीत हे चित्र आहे, असं वाटत असेल तर, खरी महत्त्वाची बाब तर पुढेच आहे. कारण, मोठ्या प्रमाणावर होणारी बर्फवृष्टी आणि साचणारा बर्फ पाहता त्यातूनच वाट काढणाऱ्या सैन्याच्या वाहनांची वाटही तितकी महत्त्वाची नसते. 


वाचा : पाहा उणे ४० अंश तापमानात भारतीय सैन्यातील जवान कसं करतात देशाचं रक्षण 


७६. ४ किमी भूखंडावर पसरलेल्या या सियाचीन ग्लेशियर भागामघ्ये ये- जा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सैन्याच्या वाहनांवर बर्फावरुन घसरण्याचं संकट असतं. यावर उपाय म्हणून वाहनांच्या चाकांवर साखळी बांधण्यात येते. ज्यामुळे चाकांवरील साखळी बर्फात रुतून वाहन सहजपणे पुढे जाण्यास मदत होते. 



वाहनं तर साखळीच्या मदतीने पुढे जातातही. पण, गोठलेले अन्नपदार्थ अनेकांची जणू परीक्षाच पाहतात. पाण्यापासून ते अगदी भाज्या आणि अंडी अशा सर्व पदार्थांपर्यंत सारंकाही या थंड वातारणात गोठून दातं. जमिनीवर पडल्यानंतरही अंड फुटत नसल्याचं पाहून याचा सहज अंदाज येतो. 



सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. जेथे तापमान अनेकदा उणे ६० अंशांपर्यंतही पोहोचतं. कित्येकदा या ठिकाणी ताशी २०० किमी इतक्या प्रचंड वेगाने हिमवादळही येतं. या अशा ठिकाणीसुद्धा देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्यदलातील जवान हे सदैव तत्पर असतात. अशा या जवानांचा देशाला सार्थ अभिमान आहे.