घर किंवा कार घेणं आता होऊ शकतं महाग
जर तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
तुम्हाला घर आणि कार घेणं आता महागात पडू शकतं. मार्च किंवा एप्रिलमध्ये होम लोन आणि कार लोनच्या व्याजदरात वाढ होऊ शकते. आपलं मार्जिन वाचवण्यासाठी बँका दरांमध्ये वाढ करु शकतात.
मागच्या काही महिन्यांमध्ये बॉन्ड यील्ड्समध्ये 100 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. ज्यामुळे बँकांचं डिपॉजिट सर्टिफिकेट जारी करणं महाग झालं आहे. बाजारातून उधार घेणं महाग झाल्याने उच्च रेटिंगच्या कंपन्यांना फंड जमा करण्यासाठी बँकांकडे जावावं लागत आहे. ज्यामुळे बँकांकडून हा रेट वाढवण्याची शक्यता वाढली आहे.
बुधवारी एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच एमसीएलआरमध्ये 10 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. हे देखील संकेत आहेत की, बँक लेंडिंग रेट्समध्ये वाढ करु शकतात. एचडीएफसी बँकेच्या आधी अॅक्सिस, कोटक महिंद्रा, इंडसइंड आणि यस बँकेने त्यांच्या एमसीएलआर रेट्समध्ये 5 ते 10 बेसिस पॉइंट्स वाढवले आहेत.