नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्लीतील ६ जनपथ येथे दोघांमध्ये बैठक सुरू आहे. महाआघाडीतील दुवा म्हणून चंद्राबाबू काम करत आहेत. चंद्राबाबू यांनी मोदी सरकार विरोधात एक दिवसीय उपोषण केले होते. राष्ट्रपतींची भेट घेऊन निवेदन ही दिले आहे. आंध्रप्रदेश या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे दिल्लीत एकदिवसीय उपोषण करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नायडू यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणात नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला आणि राष्ट्रवादीचे माजिद मेनन यांनी चंद्राबाबू नायडूंना यांना पाठिंबा दिला. तर राहुल गांधी यांनीही नायडूंची भेट घेऊन पाठिंबा दिला.


मोदी सरकारच्या विरोधात उद्या दिल्लीत आम आदमी पक्षानं आयोजित केलेल्या जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीत येत आहे. ममता बॅनर्जी गुरुवारपर्यंत दिल्लीत मुक्कामी असतील. दौऱ्यात त्यांचा विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेणार आहेत. उद्या म्हणजे १३ फेब्रुवारीला दिल्लीतील जंतरमंतरवर आम आदमी पक्षानं, हुकूमशाही हटवा, देश वाचवाचा नारा देऊन जाहीर सभा आयोजित केली आहे. या जाहीर सभेत ममता बॅनर्जींसह विरोधीपक्षाचे सगळे बडे नेते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान आम आदमी पक्षाच्या या जाहीर सभेत काँग्रेस सहभागी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.